शिरोळ : तालुक्यात काही तासांच्या अंतराने आज दोन खून झाले. त्यामुळे शिरोळ तालुका (Kolhapur Crime) हादरला आहे. शिरोळमध्ये अनोळखी व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात निलजी बामणी (ता. मिरज) येथील वीटभट्टी कामगाराचा मृत्यू झाला. खुनाचा दुसरा प्रकार तालुक्यातीलच हरोली येथे सायंकाळी घडला. पाण्याच्या वादातून दोन कुटुंबांत हाणामारी झाली. त्यातून दोघांनी एकावर सशस्त्र हल्ला केला. त्यात कराटेपटूचा खून झाला.