कोल्हापूर : गुन्हेगार बनताहेत चलाख

सीसीटीव्ही जीपीएसलाही चकवा कायदा सल्ल्याचाही आधार
Criminal
CriminalSakal

कोल्हापूर: तपासाचे बारकावे जसजसे लक्षात येऊ लागलेत, तसे गुन्हेगारही चलाख बनू लागलेत. तपास यंत्रणेच्या कचाट्यात सापडणार नाही, कोणताही पुरावा मागे राहणार नाही, याच्या खबरदारीबरोबर प्रसंगी कायदे जाणकारांच्या सल्ल्याचा आधारही त्यांच्याकडून घेतला जात आहे. अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान तपास यंत्रणेला पेलावे लागत आहे.

गुन्ह्यांच्या तपासाचे यापूर्वी खबऱ्यांचे जाळे हाच मुख्य स्रोत होता. त्याआधारे मिळालेल्या टीपच्या सुतावरून स्वर्ग गाठला जायचा आणि क्लिष्ट गंभीर गुन्ह्यांचा उलघडा व्हायचा. सध्या गुन्ह्यांच्या तपासात अधुनिकता आली आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. त्यामुळे गुन्ह्यांची जलद उकल होण्यास मदत मिळू लागली. तपासाचे हे बारकावे, वापरले जाणारे तंत्रज्ञान याचा अंदाज घेत गुन्हेगारांकडून आवश्यक त्या खबरदाऱ्या घेतल्या जाऊ लागल्यात. गुन्ह्यावेळी मोबाईलचाच वापर टाळणे, सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद होणार नाही याची काळजी, कॅमेऱ्यांची दीक्षाच बदलणे, थेट डीव्हीआरच लंपास करायचा, तर काही ठिकाणी थेट कायदे जाणकारांचा सल्ला घेऊन प्री प्लॅन गुन्हेगारी करण्याचा नवा फंडा गुन्हेगारांकडून वापरला जात आहे. चोरीतील मोबाईलची सॉफ्टवेअर बदलून विक्री करायची. चोरीतल्या वाहन थेट विक्री न करता स्पेअर पार्ट काढून त्याची विक्री करण्यासारखे गुन्हेगारांचे प्रकार तपासातून पुढे येत आहेत.

गंभीर गुन्ह्यात डब्बल जन्मठेपेची शिक्षा लागलेला एक संशयित शिक्षा भोगून पॅरोलवर बाहेर आला. त्याने हुबेहूब आपल्या सारखा दिसणारा एक व्यक्ती हेरला. त्याला दारू पाजून निर्जनस्थळी नेऊन त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्याला स्वतःचे कपडे घालून ओळखीचा पुरावा खिशात ठेवून दिला. जणू त्याचा खून झाला असल्याचे त्याने भासविण्याचा प्रयत्न केला. तपासात हा प्रकार उघड झाला. पण, सहा ते सात एक वर्षापूर्वी रुकडीत झालेल्या डॉक्टर दाम्पत्यांचा झालेला खून अद्याप उघडकीस आलेला नाही. तसेच चार ते पाच महिन्यांपूर्वी देवकर पाणंद येथील वृद्ध महिलेचा खून करून तिचा पोत्यात मृतदेह बांधून टाकला. अद्याप या प्रकाराचा उलघडा

झालेला नाही.

अल्पवयीनांचा आधार...

कायद्याच्या कचाट्यात अडकू नये, यासाठी काही गुन्हेगार अल्पवयीनांचा आधार घेऊ लागलेत. एका अल्पवयीन मुलाने काही महिन्यांपूर्वी स्वतःच्याच घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार अशाच पद्धतीने घडला असल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com