esakal | कोल्हापूर: सीमा तपासणी नाक्यावर गर्दी कमी
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर: सीमा तपासणी नाक्यावर गर्दी कमी

कोल्हापूर: सीमा तपासणी नाक्यावर गर्दी कमी

sakal_logo
By
अनिल पाटील : सकाळ वृत्तसेवा

कोगनोळी: येथील राष्ट्रीय महामार्गावर क्रमांक असणाऱ्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावरुन शनिवारी (ता. ११) दिवसभरामध्ये केवळ 74 चारचाकी वाहनांनी कर्नाटकात प्रवेश घेतला. गुरुवार (ता. 9) व शुक्रवारी (ता. 10) गणेश चतुर्थी सणामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. कोल्हापूर व इतर ठिकाणाहून कर्नाटकात जाण्यासाठी दोन दिवसांमध्ये सीमा तपासणी नाक्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र आज शनिवारी (ता‌. ११) सीमा तपासणी नाक्यावरुन कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी वाहनांची गर्दी कमी झाली होती.

हेही वाचा: Kolhapur : ऐतिहासिक देखाव्यातून प्रबोधनाची वाट

या ठिकाणी कर्नाटकात प्रवेशासाठी आरटी-पीसीआर रिपोर्टची गरज आहे. रिपोर्ट नसणाऱ्या वाहनधारकांना परत महाराष्ट्रात पाठवून देण्यात येत आहे. शुक्रवारी (ता. 10) रोजी दुपारी 4 नंतर येथील गर्दी कमी झाली आहे. दोन दिवसांमध्ये हजारो लोकांनी कर्नाटकात प्रवेश घेतला. निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक एस. व्ही. शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, एएसआय एस. ए. टोलगी, यांच्यासह अन्य पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. येथे शिक्षक काकासाहेब कमते, मनोहर हणबर, पुंडलिक यादव, आरोग्य सेविका प्रिती घागरे, आशा कार्यकर्त्या संगीता घस्ते, मंगल संकपाळ काम पाहत आहेत.

loading image
go to top