

Kolhapur Cyber Crime
esakal
Video Call Extortion Case : कुलाबा मुंबई पोलिस आणि न्यायालयाचा सेट दाखवून राजारामपुरीतील सेवानिवृत्त प्राध्यापकाची तब्बल ७९ लाखांची डिजिटल अरेस्टद्वारे फसवणूक करण्यात आली. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे शेवटची सुमारे साडेसोळा लाखांची पाठविलेली रक्कम गोठविण्यात यश आले. हा प्रकार २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.