कोल्हापूर : दहीहंडीत होणार राजकीय शक्तिप्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dahihnadi

कोल्हापूर : दहीहंडीत होणार राजकीय शक्तिप्रदर्शन

कोल्हापूर : दोन वर्षांनी होणाऱ्या दहीहंडी सोहळ्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण असले तरी नुकत्याच झालेल्या राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या सोहळ्यांना राजकारणाचीही झालर लाभणार आहे. उद्या (शुक्रवारी) लाखमोलाच्या दहीहंडीचा थरार अनुभवायला मिळणार असून यानिमित्ताने राजकीय शक्तिप्रदर्शनही घडणार आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी धनंजय महाडिक युवाशक्ती व भाजपतर्फे दसरा चौकात दहीहंडी होईल.

शिवसेना शिंदे गटातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भगवी दहीहंडी तर शिवसेनेची निष्ठेची दहीहंडी मिरजकर तिकटी चौकात होणार आहे. शहरात होणाऱ्या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी दुपारी तीननंतर केएमटी मार्गात तात्पुरता बदल केला आहे. दुपारी दोननंतर बस संख्या कमी ठेवण्यात येणार आहे.

गंगावेस वाहतूक नियंत्रण केंद्रावरील सर्व बसेस (शिरोली दुमाला, बहिरेश्वर, हणमंतवाडी) रंकाळा टॉवर येथील जाऊळाचा गणपती येथून सुटतील. जठारवाडी बस सोन्यामारुती चौक येथून निघेल. वळिवडे बस महाराणा प्रताप चौकापर्यंतच येईल. कळंबा, पाचगाव, सुर्वेनगर, आर. के. नगर, बोंद्रेनगर, कंदलगाव, नाना पाटील नगर, बाचणी, येवती, चुये, मुडशिंगी, वडगाव, रुकडी, कागल या बसेस स्टँडमार्गे सुटल्यानंतर लक्ष्मीपुरी, गोखले कॉलेज, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, संभाजीनगर, बोंद्रेनगर मार्गे ये-जा करतील.

राजारामपुरीमार्गे आर. के. नगर मार्गावर धावणाऱ्या बसेस महाराणा प्रताप चौक येथून सुटतील. तसेच दुपारी चारनंतर रुकडी, वडगाव, कागल, शिये, कदमवाडी, नागाव, शिरोली, गांधीनगर, वळिवडे या मार्गावर जाण्यासाठी शाहू मैदान, बिंदू चौक, शिवाजी चौक, लुगडी ओळ, महाराणा प्रताप चौक, शारदा कॅफे येथे उभारणाऱ्या प्रवाशांनी उषा टॉकीज येथे थांबावे. कुडित्रे बस दुपारनंतर बंद राहील.

Web Title: Kolhapur Dahihandi Will Be Political Power

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..