सोमवारपासून कोल्हापूर- दाजीपुर ही स्पेशल बस सेवा सुरू

पर्यटन ठिकाणाचा खजिना कोल्हापूरात येणाऱ्या पर्यटकांसह परिसरातील जनतेला खुला व्हावा यासाठी स्पेशल बससेवा सुरु करण्यात येत आहे
 City Bus
City Bussakal

राशिवडे बुद्रुक : दाजीपूर अभयारण्य आणि या अभयारण्यात लपलेल्या विविध पर्यटन ठिकाणाचा खजिना कोल्हापूरात येणाऱ्या पर्यटकांसह परिसरातील जनतेला खुला व्हावा. अभयारण्याची ओळख जनसामान्यांना व्हावी आणि पर्यटनाच्या कक्षा रुंदाव्यात या दृष्टीने सोमवार ( ता. ३०) पासून कोल्हापूर- दाजीपुर ही स्पेशल बस सेवा सुरू होत आहे.

 City Bus
कागल: शेट्टींच्या जलसमाधी आंदोलनात पूरग्रस्त सहभागी होणार

जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून आणि वन्यजीव विभागाच्या नियोजनातून रोज एक फेरी आणि 15 प्रवासी अशी ही पर्यटन सेवा सुरू होत आहे. उद्या सोमवारी ( ता. 30) सकाळी 09.00 वाजता कोल्हापूर येथील वनविभागाच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात राधानगरी अभयारण्य पर्यटन वाढविण्याच्या हेतूने या बस सफारीचे उद्घाटन माननीय पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते व आमदार प्रकाश आबीटकर यांच्या उपस्थितीत होत आहे.

राधानगरी अभयारण्य हे जागतिक वारसा स्थळ असून तेथील पर्यटनाला चालना मिळावी म्हणून, पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यात यासाठी तरतूद केली. कोल्हापूर वन्यजीव विभागाने 15+2 सीटर बस विकत घेतली असून, ही बस दररोज कोल्हापूर ते राधानगरी- दाजीपूर पर्यटन करीता सुरू करण्यात येत आहे. एका पर्यटकांस नाममात्र 300 रुपये फीमध्ये दिवसभर जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे.

 City Bus
निगेटिव्ह अहवाल पाहूनच कर्नाटकात प्रवेश द्या

राधानगरी अभयारण्यात हत्तीमहाल, बटरफ्लाय पार्क, राऊतवाडी धबधबा, माळवाडी बोटिंग व दाजीपूर गवा सफारी या सर्व ठिकाणांना भेट देत येणार आहे. आठवड्यातून एक दिवस या बसमधून शासनातर्फे अनाथ, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी याना सुद्धा मोफत जंगल सफारी करता येणार आहे.

"पर्यटनाच्या नकाशावर राधानगरी अभयारण्याचे महत्व अधोरेखित होण्यासाठी ही सेवा सुरु करीत आहोत. तीन महिन्यापूर्वीच ही बस सेवेत दाखल झाली आहे; मात्र कोरोनामुळे की सुरू केली नव्हती. उद्या याचे अधिकृत उद्घाटन होणार आहे. ही बस सीबीएस स्थानकावरून सकाळी आठ वाजता सुटेल. सध्यातरी स्पॉटवर किंवा वन्यजीव कार्यालयात याची बुकिंग असेल. भविष्यात ऑनलाईन बुकिंगची सेवा सुरू करीत आहोत."-विशाल माळी विभागीय अधिकारी (वन्यजीव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com