Crocodile Attack in Dattawad Village
esakal
कुरुंदवाड (कोल्हापूर) : दूधगंगा नदीपात्रात आंघोळीला गेलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त कर्मचारी लक्ष्मण कलगी (वय 59) यांच्यावर मगरीने जबरदस्त हल्ला केला (Crocodile Attack in Dattawad) व उपचार सुरु करण्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना आज दत्तवाड (ता. शिरोळ) येथे घडली. आज सकाळी या घटनेने दत्तवाड गाव व दूधगंगा काठ गलबलून गेला.