कोल्हापूर : दुपारी बाराचे बंद बाबतचे अपडेट

kolhapur dealers decision of closed market update 12 pm in kolhapur meeting after 3 pm
kolhapur dealers decision of closed market update 12 pm in kolhapur meeting after 3 pm
Updated on

कोल्हापूर : कोल्हापुरातील सर्व दुकाने बंद राहणार की नाही, या ठोस निर्णयापुर्वीच आज सकाळी राजारामपुरीतील दुकाने सुरू झाली. दरम्यानच्या काळात जिल्हाधिकारी व्हिडीओ कॉन्फरंसिगव्दारे मुख्य सचिवांशी चर्चा करत आहेत. तर चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी निर्णयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बसून आहेत. दरम्यान दुपारी उपमुख्यमंत्र्यांसोबत जिल्ह्यातील मंत्र्याची बैठक होणार की नाही, यामध्ये काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद करण्याच्या निर्णय विरोधात कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीजच्या वतीने बुधवारी सकाळी अकरा ते बारा दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांची भूमिका समजावून घेतली. दुपारी जिल्हाधिकारी यांची मुख्य सचिवांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स होत आहे. यामध्ये व्यापाऱ्यांचे मत राज्याच्या मुख्य सचिवांपर्यंत पोहोचविले जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाला दुपारी बारा वाजता दिली आहे. 

साधारण दुपारी तीननंतर याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जिल्ह्यातील पालकमंत्री सतेज पाटील, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची बैठक होत आहे, या बैठकीत सर्व दुकाने बंद ठेवायची की नाही ? यावर निर्णय होण्याची शक्‍यता आहे. सर्व दुकाने बंद ठेवायची की सुरू ठेवायची याबाबत अद्याप ठोस निर्णय झाला नसला तरी राजारामपुरी मधील काही दुकाने आज सकाळी अकराच्या सुमारास सुरू करण्यात आली आहेत. सध्या दुकाने बंद ठेवून परवडणारे नसून आम्हाला कुटुंबियांसमवेत आत्महत्या करावी लागेल, त्यामुळे आम्ही दुकाने सुरू करणार असा पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतल्यामुळे आम्ही राजारामपुरीतील दुकाने सुरू केली असल्याची माहिती व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी ललित गांधी यांनी दिली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com