Dhananjay Mahadik statement on Rahul Gandhi voter revision
esakal
कोल्हापूर : मतदार नोंदणीबाबत निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या पत्राचा चुकीचा अर्थ काढून भारतीय जनता पक्षाला बदनाम करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा निषेध करतो. गांधी हे संविधानिक पदावरील कोणत्याही अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे मत ऐकत नाहीत. गांधी यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला (Dhananjay Mahadik statement on Rahul Gandhi voter revision) नाही, हे ते मान्य करत नसल्याने ते भाजपविरोधात चुकीची माहिती सांगून लोकांची दिशाभूल करत असल्याची टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली. भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.