

Kolhapur court outside incident news
esakal
Court Premises Incident Kolhapur : घटस्फोटानंतर चार वर्षीय मूकबधिर मुलासोबत जगताना हताश झालेल्या तरुणाने जिल्हा व सत्र न्यायालयासमोरील रस्त्यावर आत्मदहनाचा प्रयत्न केला. शाहूपुरी पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत त्याच्या हातातील रॉकेलची बाटली व आगपेटी काढून घेतली. त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मिथून शामराव कुंभार (वय ३०, रा. माणगाव, हातकणंगले) असे त्याचे नाव आहे.