
Kolhapur Fertilizer Quality : कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागाने ४४१ खत विक्रेत्यांकडील रासायनिक खतांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. तसेच कीटकनाशकाचे १३३ आणि बियाण्यांचे ७६२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. शासकीय प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीत एकूण ८७ खतांचे नमुने अप्रमाणित आले आहेत. त्यापैकी १२ नमुने कोर्ट केस पात्र, तर ७५ नमुने ताकीद पात्र ठरले आहेत.