Kolhapur : अब्रूच्या भीतीने वाढते ‘हनी ट्रॅप’चे जाळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

honey trap

Kolhapur : अब्रूच्या भीतीने वाढते ‘हनी ट्रॅप’चे जाळे

sakal_logo
By
राजेश मोरे - सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : बेसीरिजमधील आणि चित्रपटातील ‘हनी ट्रॅप’च्या घटना आता थेट गल्लीबोळापर्यंत पोचल्या आहेत. अब्रूच्या भीतीने ‘हनी ट्रॅप’चे जाळे वाढत आहे. तक्रारदारच पुढे येत नसल्याने ‘हनी ट्रॅप’ करणारे मोकाट आहेत. त्यांना रोखण्यासाठी पुढे यायलाच पाहिजे. मात्र, ट्रॅप होऊच नये म्हणून दक्षताही घेतली पाहिजे.

हेही वाचा: एसटी सुरू होण्याच्या प्रतीक्षेने कोल्हापूरात प्रवासी बस स्थानकातच

मुंबई, इचलकरंजीपाठोपाठ कोल्हापुरातही हनी ट्रॅपचे प्रकार पुढे येत आहेत. एका कापड व्यापाऱ्याला ट्रॅपमध्ये अडकवून अडीच लाख रुपये टोळीने लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संबंधित व्यापाऱ्याने कीटकनाशकाची बाटली बेडखाली आणून ठेवल्याचेही पोलिस तपासात पुढे आले होते. जिल्ह्यात गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून बड्या व्यापाऱ्यांना, श्रीमंतीचा बडेजाव करणाऱ्यांना ट्रॅप केल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतूनच पुढे येत आहे. ट्रॅपमध्ये अडकलेले घरच्यांना हा प्रकार समजला तर काय होईल?, नातेवाईक, समाजातील लोक काय म्हणतील? अशा अब्रूच्या भीतीने तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यांची हीच भीती गुन्हेगारांना खतपाणी घालत आहे. यातूनच ट्रॅप करणाऱ्यांचे जाळे जिल्ह्यात विस्तारण्याची भीती निर्माण झाली आहे. पोलिसांत तक्रार हाच त्यावर उपाय आहे.

हेही वाचा: निवडणुकीपूर्वीच धनंजय महाडीकांकडून पराभव मान्य ; सतेज पाटील

"कोविड काळात अनेकांचा स्क्रीन टाईम दुप्पट, तिप्पट झाला. त्यातूनच ‘हनी ट्रॅप’सारखे प्रकार पुढे येत आहेत. यातून काहींनी तक्रार न देता टोकाचे पाऊल उचलले. मात्र, असे न करता तुमच्या फसवणुकीची तक्रार थेट सायबर सेलशी संपर्क साधून करा. पोलिस तुमच्या पाठीशी आहेत. तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. यातून इतरांवर होणारे ‘हनी ट्रॅप’ रोखण्यास मदत होणार आहे."

- शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक

loading image
go to top