Kolhapur Bus Stand | एसटी सुरू होण्याच्या प्रतीक्षेने कोल्हापूरात प्रवासी बस स्थानकातच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur Bus Stand

एसटी सुरू होण्याच्या प्रतीक्षेने कोल्हापूरात प्रवासी बस स्थानकातच

कोल्हापूर - एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आज राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात भरघोस वाढ केली असली तरी विलिनीकरणाचा मुद्दा मान्य केलेला नाही. त्यामुळे हा संप मागे घ्यायचा की नाही घ्यायचा याबाबतचा निर्णय अंतिम निर्णय एसटी कर्मचारी उद्या गुरुवारी सकाळी घेणार आहेत. संपाबाबतची पुढील घोषणा मुंबईतील आझाद मैदानावर होईल. त्यानंतरच कोल्हापुरात तील संप मागे घेण्याबाबत निर्णय होईल. अशी माहिती एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आली. त्यामुळे संप मागे घेण्याबाबत संभ्रम कायम आहे.

हेही वाचा: निवडणुकीपूर्वीच धनंजय महाडीकांकडून पराभव मान्य ; सतेज पाटील

साडेआठ वाजल्यानंतर मध्यवर्ती बस स्थानकातील बहुतांशी संपकरी कर्मचारी निघून गेले तर एसटी प्रवासी वाहतूक सुरू होईल. या प्रतीक्षेत अनेक प्रवासी बसस्थानकात येऊन थांबले आहेत. मात्र, संप मागे घेण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने कोल्हापुरातून एकही गाडी अद्यापि सुटलेली नाही. एसटी प्रशासनाच्या पातळीवर सुद्धा वाहतूक सुरू करण्याविषयी कोल्हापुरात तरी कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे बहुतांशी गाड्या मध्यवर्ती बसस्थानकाच्या मागील आगारात थांबून आहेत.

loading image
go to top