esakal | ...तरच न्यायालयात प्रवेश मिळणार?

बोलून बातमी शोधा

Kolhapur District Bar Association appeals to parties and lawyers not to come to court kolhapur marathi news

न्यायालयीन कामकाजासाठी केवळ अत्यावश्‍यक पक्षकारांनाच आत प्रवेश दिला जाण्यावरून आज जिल्हा व प्रमुख सत्र न्यायालयाच्या दारात काही प्रमाण गर्दी झाली.

...तरच न्यायालयात प्रवेश मिळणार?
sakal_logo
By
लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : न्यायालयीन कामकाजासाठी केवळ अत्यावश्‍यक पक्षकारांनाच आत प्रवेश दिला जाण्यावरून आज जिल्हा व प्रमुख सत्र न्यायालयाच्या दारात काही प्रमाण गर्दी झाली. मुख्य दरवाजाच बंद केल्यामुळे गर्दी वाढत गेली. ज्यांची तारीख नाही, ज्यांना न्यायालयात जाणे आवश्‍यक नाही अशांना अडविण्यात आल्यामुळे हा प्रकार घडला. मात्र ज्यांच्या तारखा आहेत, काम चालणार आहे अशांना आता सोडल्यामुळे गर्दी निवळली. ज्यांच्या तारखा चालणार नाहीत, ज्यांचे अत्यावश्‍यक काम नाही, अशा पक्षकारांनी न्यायालयात येवू नये, वकिलांकडून पुढील तारीख घ्यावी, शक्‍यतो तारीख नसली तर वकिलांनीही न्यायालयात येणे टाळावे, असे आवाहन महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ऍड. विवेक घाटगे आणि जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रणजित गावडे यांनी केले आहे. 

अध्यक्ष गावडे यांनी सांगितले, न्यायालयात दोन सत्रात काम सुरू आहे. केवळ चार तासच कामकाज चालते. यावेळी अत्यावश्‍यक "बेल' व इतर कामे चालतात. त्यामुळे पक्षकारांनी तारीख नसताना किंबहुना तारीख चालणार नसताना न्यायालयात येवून गर्दी करू नये. अनेक वकिलांनीही ज्यांची तारीख नाही त्यांनी शक्‍यतो न्यायालयात येण्याचे टाळावे. तसेच त्यांच्या पक्षकारांना अनावश्‍यक असल्यास न्यायालात बोलावू नये. 

हेही वाचा- पोलिस भरतीची वाट पाहणारी तरुणाई रोजंदारीकडे; शासनाच्या धोरणामुळे नैराश्‍येत वाढ

आज केवळ अत्यावश्‍यक कामकाज असलेल्यांनाच न्यायालयात सोडण्यात आले. त्यामुळे काही प्रमाणात मुख्य प्रवेशद्वाराजवळ गर्दी झाली होती. मात्र ज्यांचे काम चालणार आहे त्यांना प्रवेश दिल्यामुळे गर्दी कमी झाली. उद्या (ता.7) हे नियम आणखी कडक होण्याची शक्‍यता आहे. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या कोरोना महामारीतील संसर्ग वाढू नये म्हणून स्वतंत्र सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पक्षकार, वकील न्यायालयात हजर राहिले नाहीत तर त्यांच्या विरोधात कोणताही ऑर्डर केली जाणार नाही. तसेच केवळ अत्यावश्‍यक खटलेच सुरू राहणार असून न्यायालयीन कामकाजाची वेळी ही कमी केली असून ती दोन सत्रात असणार आहे. त्यामुळे पक्षकार, वकीलांनीही याचा विचार करून अनावश्‍यक न्यायालयात येवू नये, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्यावतीने करीत आहोत,असे अध्यक्ष गावडे आणि कौन्सिलचे सदस्य घाटगे यांनी सांगितले. 

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन मधील कॅन्टीन आज बंद करण्यात आले. तेथे केवळ पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली. तसेच वकीलांचे कामकाज संपल्यानंतर बार असोसिएशनच्या रूम मध्ये न थांबता घरी जावे, असेही निर्देश देण्यात आले असल्याचेही अध्यक्ष गावडे यांनी सांगितले. 

संपादन- अर्चना बनगे