

Kolhapur Population census
sakal
कोल्हापूर : देशाची जनगणना दोन वर्षांत होणार आहे. २०११ नंतर तब्बल १६ वर्षांनी ती होत आहे. जिल्ह्यात गेल्या १४ वर्षांत पावणेपाच लाखांच्या पुढे लोकसंख्या वाढली आहे. त्यात वर्षभरात २६ हजार ३१७ जणांची भर पडली असून, याची टक्केवारी ०.६१ इतकी आहे.त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे ४३ लाख ४८ हजार ९६३ वर पोहोचली आहे.