Only 1436 Tons Left: Kolhapur Faces Fertilizer Crisis During Peak Sowing SeasonSakal
कोल्हापूर
DAP fertilizer: 'डीएपी रासायनिक खताची तीव्र टंचाई'; काेल्हापूर जिल्ह्यात १४३६ टन शिल्लक ; एक लाख १५ हजार हेक्टरवर पेरणी
shortage of chemical fertilizer : यंदा १४ मे पासूनच झालेल्या पावसामुळे शेतीचे गणित बिघडले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ६२ टक्के म्हणजे एक लाख १५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. भुईमूग, सोयाबीन, ऊस पिकासाठी खताची मागणी वाढली आहे.
कुंडलिक पाटील
कुडित्रे : यंदा खरीप हंगामात डीएपी रासायनिक खताची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात फक्त १ हजार ४३६ टन डीएपी शिल्लक आहे. चीनने संयुगांच्या (रेअर अर्थ) निर्यातबंदीपाठोपाठ डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) या रासायनिक खताचा पुरवठाही बंद केला आहे. त्याचा थेट परिणाम भारतासह जागतिक खतपुरवठ्यावर झाला आहे. ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांना ‘डीएपी’ मिळवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या असून, काही भागांत वाढीव दराने खताची विक्री केली जात आहे.