
Medical Line Kolhapur : प्रविण देसाई : कोल्हापूर जिल्ह्यात औषध विक्रीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई केली आहे. विविध प्रकारच्या अनियमितता आणि कायद्याचे उल्लंघन, यामुळे एकूण ३५ औषध दुकानांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये १९ दुकाने परवाने रद्द करण्यात आले असून, १६ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे औषध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.