Father and Younger Brother killed in Hatkanangale
esakal
हातकणंगले (कोल्हापूर) : गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या शेतीच्या वादातून आज दोन भाऊ आणि वडिलांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर दुहेरी खुनात झाल्याची धक्कादायक (Kolhapur family dispute killed case) घटना हिंगणगाव (ता. हातकणंगले) येथे घडली. यात लहान भाऊ शीतल मारुती कुंडले (वय ४५) आणि वडील मारुती बंडू कुंडले (वय ७२) यांचा कुऱ्हाड आणि खोऱ्याचे घाव घालून निर्घृण खून झाला. घटनेनंतर थोरला भाऊ संभाजी मारुती कुंडले (वय ४७) हा हातकणंगले पोलिसांत हजर झाला आहे.