Kolhapur Election: महापालिका निवडणुकीत पुन्हा विलंब प्रारूप मतदार यादीची घोषणा २० नोव्हेंबरपर्यंत ढकलली
Voter List Publishing date extended: मतदार यादी तयार करण्यास लागणारा वाढलेला कालावधी आणि वारंवारच्या मुदतवाढीमुळे निवडणूक प्रक्रियेबाबत निर्माण झालेले प्रश्न अधिक गंभीर रूप धारण करत आहेत.
कोल्हापूर: महापालिका निवडणुकीसाठी आवश्यक असलेली प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा मुदत वाढवली आहे. याबाबतचा सुधारित कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.