

Political candidates and workers discuss voter turnout and cross voting trends ahead of vote counting in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : कमी मतदान झाले असल्याने त्याचा फटका कोणाला बसणार याची चर्चा शहरात जोरात सुरू झाली. महायुती व काँग्रेस आघाडीला कमी मतदानाचा फायदा होणार की, फटका बसणार, क्रॉस व्होटिंग कोणत्या भागात होणार, त्याचा फटका किती बसणार, कुणाच्या छुप्या मदतीचा किती परिणाम होणार, याची आकडेमोड करण्यात भागाभागांतील उमेदवार व कार्यकर्त्यांची आजचीही रात्र गेली. मतमोजणीनंतर सर्व चित्र स्पष्ट होणार असून, त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.