Kolhapur EVM Machine : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १८ दिवस ‘ईव्हीएम’ बंदिस्त; नागरिकांचे लक्ष आता २१ डिसेंबरवर!
EVMs Locked in Strong Rooms : जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि पंचायतीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली; मात्र न्यायालयाच्या निर्णयानुसार मतमोजणी २१ डिसेंबरला होईल. त्यासाठी जिल्ह्यात १३ ठिकाणी मतदानापूर्वी स्ट्राँग रूम उभारण्यात आल्या होत्या.
कोल्हापूर : उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नगरपरिषद आणि पालिकांच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे पुढील १८ दिवस मतदान यंत्रे स्ट्राँग रूममध्ये ठेवावी लागणार आहेत.