

damaged electric line
sakal
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात विजेच्या धक्क्याने तब्बल ४१ नागरिक, शेतकरी व महावितरणचे कंत्राटी कामगार यांना जीव गमवावा लागला आहे. विजेची खराब उपकरणे, बेकायदेशी वीज जोडण्या, विद्युत उपकरणे हाताळताना घरात, शेतातील निष्काळजीपणा, महावितरणकडून विद्युत उपकरणांच्या नियमित तपासणींचा अभाव आदी कारणांमुळे हे अपघात झाल्याचे चित्र आहे. असे अपघात जीवावर बेतणारे असल्याने ग्राहक, शेतकरी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता बाळगण्याची गरज आहे.