
कोल्हापूर : महादेवी हत्तीण नांदणी मठातून ‘वनतारा’मध्ये नेल्याने संतप्त झालेल्या कोल्हापुरकरांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक पदयात्रा काढत हत्तीणीला परत आणण्याची मागणी केली. या प्रकरणात पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी लक्ष घालावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. माजी खासदार राजू शेट्टी यांनी या मोर्चाचे नेतृत्व करताना भाजपवर टीकास्त्र सोडले.