Kolhapur Fake Currency Racket : कोण आहे हा 'देवा भाई'? ज्यानं कोल्हापुरात उभं केलं बनावट नोटांचं जाळं; गोकुळ शिरगाव एमआयडीसीत करायचा नोटांची छपाई!

Shahupuri Police Arrest Third Suspect in Fake Currency Case : कोल्हापूरमध्ये बनावट नोटा प्रकरण उघडकीस आले असून शाहूपुरी पोलिसांनी तिसऱ्या आरोपीला अटक केली आहे.
Fake Currency Racket MIDC Kolhapur

Fake Currency Racket MIDC Kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर : बनावट नोटा प्रकरणात शाहूपुरी पोलिसांनी तिसऱ्या संशयिताला अटक केली. राहुल अभिमान रसाळ (वय २०, रा. राजेंद्रनगर) असे त्याचे नाव आहे. छपाईचे साहित्य जप्त करण्यासाठी पोलिस ‘देवा भाई’ नावाच्या व्यक्तीचा शोध घेत (Kolhapur Fake Currency Racket) आहेत. त्याने प्रिंटरच्या मदतीने नोटांची छपाई केल्याचे तपासात समोर आले आहे. गोकुळ शिरगाव एमआयडीसीत खोली भाड्याने घेऊन तो छपाई करत असल्याचेही संशयितांकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com