Fake FDA Officer : 50 हून अधिक हॉटेल व्यावसायिकांना लुटणाऱ्या तोतया FDA अधिकाऱ्याला अटक; कोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई, साथीदार पसार

Kolhapur fake FDA officer extortion case : कोल्हापुरात अन्न व औषध प्रशासनाचा तोतया अधिकारी बनून नाश्ता सेंटरवर छाप्याची भीती दाखवत १० हजारांची खंडणी मागणाऱ्या महादेव लोहारला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली.
fake FDA officer arrested for ₹10,000 extortion

fake FDA officer arrested for ₹10,000 extortion

esakal

Updated on

कोल्हापूर : नाश्ता सेंटरवर छाप्याची भीती घालून १० हजार रुपयांची खंडणी मागणारा अन्न व औषध प्रशासनाच्या तोतया अधिकाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक (fake FDA officer arrested in Kolhapur) केली. महादेव नामदेव लोहार (वय ३५, रा. सुतार गल्ली, गोगवे, ता. शाहूवाडी) असे संशयिताचे नाव आहे. त्याचा साथीदार प्रशांत सर्जेराव यादव (रा. पिशवी, ता. शाहूवाडी) पसार झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com