
Kolhapur Robbery Case : सम्राटनगर परिसरातील गोविंदराव सावंत हौसिंग सोसायटीतील बंगल्यात शिरलेल्या दोघा चोरट्यांनी घरातील ८३ वर्षीय वृद्धाला चाकूचा धाक दाखवत २५ तोळे दागिने पळवून नेले. लाडा कृषी पंपचे मालक राजीव जयकुमार पाटील यांच्या घरी काल(ता.१२) दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. मागील दरवाजातून शिरलेल्या चोरट्यांनी अवघ्या पंधरा मिनिटांत घरातील तीन लॉक उघडत ही चोरी केल्याने संशयित माहीतगार असावेत, असा पोलिसांना संशय आहे. दरम्यान या गुरुवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. पोलिसांनी शुक्रवारी काही संशयित ताब्यात घेतले आहेत.