Farmers Protest: रस्त्यावर धग, चुलीवर मायेची फोडणी! ;किणी पथकर नाक्यावरील चित्र; गावागावांतून शिदोरी पोहोच

Farmers Protest Kolhapur : ऊसदराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात गावागावांतून अन्नधान्य, भाकरी, भाजी, दूध आणि पाणी पोहोचवले जात आहे. हजारो आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था करताना ग्रामीण भागातील नागरिकांनी माणुसकी आणि एकजुटीचे दर्शन घडवले आहे.
Villagers Bring Homemade Food and Meals for Farmers Protesting at Kini Toll Plaza

Villagers Bring Homemade Food and Meals for Farmers Protesting at Kini Toll Plaza

esakal

Updated on: 

कोल्हापूर : दोन दिवसांपासून आंदोलनाची धग कायम आहे. प्रत्येक आंदोलनाची स्वतःची एक ताकद असते, एक भूमिका असते, एक संघर्ष असतो. मात्र, या सगळ्यांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन काहीसे वेगळेच भासते. आंदोलनात रस्त्यावर शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू असतानाच दुसरीकडे हजारो माणसांसाठी चुलीही तेवढ्याच ताकदीने पेटलेल्या आहेत. आंदोलनाची घोषणा झाली की केवळ कार्यकर्ते जमवण्याचे नियोजन होत नाही, तर जेवणाची जबाबदारी कोण घेणार, पाणी कोठून येणार, किती लोकांसाठी स्वयंपाक करायचा, याचेही एक अलिखित नियोजन सुरू होते.

Loading content, please wait...