Kolhapur FDA : ‘एफडीए’चा वाढला धाक! सहा नवे निरीक्षक; भेसळखोरांची आता खैर नाही
Curb Food Adulteration : अन्न व औषधांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या एफडीए विभागाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. दीर्घकाळ अपुऱ्या मनुष्यबळामुळे अडचणीत असलेला विभागात सहा नव्या निरीक्षकांच्या नियुक्ती.
FDA officials conduct inspection as new inspectors
कोल्हापूर : जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभाग दीर्घकाळापासून मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अडचणीत होता. आता आणखी सहा निरीक्षक उपलब्ध झाल्यामुळे ‘एफडीए’चा धाक वाढणार आहे.