
कोल्हापूरातील न्यायदानाला गौरवशाली असा इतिहास आहे. १८४४ मध्ये कोल्हापुरात राज्यकर्त्यांकडूनच पहिलं न्यायालय स्थापन केलं गेलं होतं. कोल्हापूर संस्थानाचं स्वत:चं उच्च आणि सर्वोच्च न्यायालय होतं. तर १८६७मध्ये जिल्हा न्यायालय स्थापन झालं. या न्यायालयाचे पहिले जिल्हा न्यायाधीश महादेव गोविंद रानडे हे होते. जिल्हा न्यायालयाची इमारत ही दीडशे वर्षांपेक्षा जुनी आहे. जिल्हा न्यायालयाच्या शतसांवत्सरिक महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेत पहिल्या सेशन्स खटल्याची एक घटना नोंद करण्यात आलीय. त्याआधी कोल्हापुरात न्यायदानाची पंचपद्धत होती. त्यानंतर खटल्यांची न्यायव्यवस्था सुरू झाली. मात्र लोकांना कोर्ट आणि कोर्टाची व्यवस्था समजण्यास सुरुवातीचा काही काळ गेला.