कोल्हापूर : पहिल्याच पेपरला लागला कस

बारावी परीक्षेस प्रारंभ; दोन वर्षांच्या खंडानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन
HSC-Exam
HSC-Examsakal
Updated on: 

कोल्हापूर: बारावीचा इंग्रजीचा पेपर सोपा गेला, अशा प्रतिक्रिया विद्यार्थी वर्गातून आज व्यक्त झाल्या. गतवर्षी ऑनलाईन परीक्षा झाल्याने यंदा पेपर कव्हर करताना मात्र त्यांचा चांगलाच कस लागला. ऑनलाईन परीक्षेचा हट्ट धरणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अखेर ऑफलाईन परीक्षा द्यावी लागली. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातर्फे परीक्षेचे आयोजन केले आहे.

HSC-Exam
Kolhapur; रंकाळा, दाभोळकर कॉर्नर, टाऊन हॉल येथे होणार उड्डाणपुल 

परीक्षेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांत आज उत्सुकता होती. ज्या महाविद्यालयात विद्यार्थी शिकतो, त्याच केंद्रात त्याची बैठक व्यवस्था केली होती. त्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सकाळी अकरा वाजता पेपर सुरू होणार असल्याने त्यांनी दहा वाजता महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर हजेरी लावली. पालक वर्गही त्यांना सोडण्यासाठी महाविद्यालयात आला होता. पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी आपापल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा दिल्या.

पेपर हातात आल्यानंतर तो सोडविण्यास विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. गतवर्षी ऑनलाईन परीक्षा झाल्याने विद्यार्थ्यांची लिखाणाची सवय मोडली होती. त्याची जाणीव आजच्या ऑफलाईन परीक्षेत झाल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या. पेपर पूर्ण कव्हर करताना त्यांची दमछाक झाली.

HSC-Exam
Kolhapur : नदी प्रदूषण थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी दिल्या 'या' सूचना

ज्या विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडविण्याची तयारी केली होती. त्यांना पेपर कव्हर करता आला. ऑनलाईन परीक्षा होईल, या भ्रमात असणाऱ्या विद्यार्थ्यांचा भोपळा फुटल्याने त्यांचा चेहऱ्यावरही पेपर चांगला गेल्याचा भाव राहिला.

आजचा पेपर सोपा होता. पूर्वपरीक्षेत प्रश्नपत्रिका सोडविण्याची तयारी महत्त्वाची ठरली. त्यामुळे पूर्ण पेपर सोडवता आला. ऑनलाईन परीक्षा ऑब्जेक्टिव्ह होती. ऑफलाईन परीक्षेत मात्र डोक्यात साठवलेले कागदावर उतरावे लागते. त्याचा अनुभव घेता आला.

- सायमा मोमीन, विज्ञान शाखा, महावीर महाविद्यालय

पेपर चांगला होता. इंग्रजीचा पेपर असल्याने परीक्षेपूर्वी पूर्वी मनावर ताण होता. पेपर हातात पडल्यानंतर मात्र तो कमी झाला. तीन तासात पेपर कवर करण्याचे आव्हान होते. ते पूर्ण झाल्याने समाधानी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com