Almatti Dam : कोल्हापूर, सांगलीला मोठा दिलासा! पूर टाळण्यासाठी 'आलमट्टी'तून वेळोवेळी सोडणार पाणी

आता आलमट्टीमुळे पूरस्थिती होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.
Karnataka Government Almatti Dam
Karnataka Government Almatti Damesakal
Summary

गेल्यावर्षी पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शासनाने आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने कर्नाटक सरकारशी समन्वय साधत आलमट्टी धरणातील पाणीसाठा संतुलित ठेवण्याचे काम केले.

कोल्हापूर : यंदा पूरस्थिती निर्माण झाली तर आलमट्टीमधील पाणी समतोल रहावे, यासाठी शासनाकडून मुख्य सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दक्ष राहणार आहे. त्यामुळे कर्नाटकातील आलमट्टी धरणातून (Almatti Dam) वेळोवेळी पाणी सोडून कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Flood) पूरस्थिती नियंत्रणात ठेवली जाणार आहे.

त्यासाठी, कर्नाटक शासनही (Karnataka Government) मदत करणार आहे. जिल्ह्यात २०१९ आणि २०२१ मध्ये महापूर आला. २०१९ च्या तुलनेत २०२१ मध्ये काही फूट पाणी जास्तच आले. लाखो लोकांना आणि जनावरांना स्थलांतरित करावे लागले. कृषी, उद्योग, शासकीय कार्यालयांसह इतर आवश्‍यक वस्तुंचे प्रचंड नुकसान झाले.

Karnataka Government Almatti Dam
Cyclone Biparjoy Alert : चक्रीवादळात स्वतःला कसं सुरक्षित ठेवाल? जाणून घ्या काही उपाय

या सर्व पुराला कर्नाटकमधील आलमट्टी धरण कारणीभूत असल्याचे सांगितले जात होते. यापूर्वी कर्नाटकमधील आलमट्टी धरणात प्रमाणापेक्षा जास्त पाणीसाठा केला जात असे. याचा फटका कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला बसतो. सांगलीसह कोल्हापूर जिल्हा पाण्याखाली जाईल याची भीती घेऊनच पावसाळ्याचे चार महिने काढावे लागतात. आता आलमट्टीमुळे पूरस्थिती होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

Karnataka Government Almatti Dam
Cyclone Biparjoy Alert : कोकण किनारपट्टीवर 'या' कारणामुळं मोठ्या लाटा; तज्ज्ञांकडून महत्वाची अपडेट समोर

त्यामुळे कितीही पाऊस झाला तरीही पूरस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनासह पाटबंधारे विभाकडून काळजी घेतली जाणार आहे. गेल्यावर्षी पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी शासनाने आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने कर्नाटक सरकारशी समन्वय साधत आलमट्टी धरणातील पाणीसाठा संतुलित ठेवण्याचे काम केले. त्यामुळे पुराचा फटका बसला नाही.

Karnataka Government Almatti Dam
Uttarkashi Love Jihad Row : लव्ह जिहाद प्रकरण पेटलं; 3 वर्षात 1035 हिंदू मुली बेपत्ता, महापंचायत भरणार

या वर्षी सांगली जिल्ह्यातील एक अधिकारी कायमस्वरूपी आलमट्टी धरणाची माहिती घेऊन ती कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेला सांगितली जाणार आहे. ज्या अधिकाऱ्याला कन्नड भाषा येते अशाच अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. याउलट कर्नाटकमधील आलमट्टी धरणाचे पाणी व्यवस्थापन करणारे अधिकारीही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पावसाची आणि पुराची माहिती घेतात.

ही माहिती घेऊन धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवायचा की कमी करायचा हा निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. २०२१ मध्ये आलमट्टीमध्ये पाणीसाठा केल्याचा कर्नाटकलाही फटका बसला होता. गेल्यावर्षी कर्नाटकमधील अधिकाऱ्यांनीही कोल्हापूर जिल्ह्यातील पुराची आणि पावसाची माहिती घेऊन पाण्याचा विसर्ग २ लाख ते ४ लाख क्युसेक इतका सुरू ठेवला होता. त्यामुळे पुराचा फटका बसला नाही.

Karnataka Government Almatti Dam
Marathi Schools : मराठी शाळांमध्ये परप्रांतीय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश; सरकारी शाळांत पटसंख्या वाढणार!

गेल्यावर्षी कर्नाटकमधील अधिकाऱ्यांनी आलमट्टी धरणातील पाणी वेळोवेळी सोडले आहे. २ ते ४ लाख क्युसेकपर्यंत पाणी सोडत राहिल्यामुळे पुराची तीव्रता वाढली नाही. या वर्षीही त्याचपद्धतीने नियोजन केले जाणार आहे.

-प्रसाद संकपाळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com