Uttarkashi Love Jihad Row : लव्ह जिहाद प्रकरण पेटलं; 3 वर्षात 1035 हिंदू मुली बेपत्ता, महापंचायत भरणार

काही मुस्लिम दुकानदार हिंदू मुलींना फूस लावून त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली.
Uttarkashi Love Jihad Row
Uttarkashi Love Jihad Rowesakal

उत्तराखंडमध्ये गेल्या 3 वर्षात 1035 मुली बेपत्ता झाल्या आहेत. फक्त उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात 64 महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे, त्यापैकी 55 महिलांना घरी परत आणण्यात आलं आहे. मुली बेपत्ता झाल्याच्या बातम्यांदरम्यान, उत्तराखंडमध्ये अशांतता पसरवणारे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून त्याची सुरुवात झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तरकाशीच्या पुरोला येथील दोन तरुण एका मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न करताना पकडण्यात आलंय. काही मुस्लिम दुकानदार हिंदू मुलींना फूस लावून त्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू झाली.

Uttarkashi Love Jihad Row
Kolhapur Riots : सामाजिक सलोखा बिघडवून कोणीतरी दंगली घडवत आहे; जयंत पाटलांना वेगळाच संशय

ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि स्थानिकांनी संताप व्यक्त करत मोर्चा काढला. याप्रकरणी पोलिस-प्रशासनाला निवेदनही देण्यात आलंय. प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, पुरोलानंतर गंगोत्रीमध्ये लव्ह जिहाद प्रकरण समोर आल्यानंतर परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली. त्यानंतर येथील रोष, निदर्शने आणि धमक्यांनंतर परिस्थिती झपाट्याने बिघडू लागली.

अशी प्रकरणे समोर आल्यानंतर काही स्थानिक लोकांनी मुस्लिम समाजाविरोधात आवाज उठवला. एका वर्गाने मुस्लिमांना परिसर सोडून जाण्याची धमकी दिली. काही मुस्लिम दुकानदारांनी आपली दुकाने रिकामी केली असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. एवढंच नाही तर शहरात काही वादग्रस्त पत्रिकाही टाकण्यात आल्या आहेत, ज्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Uttarkashi Love Jihad Row
Uttarkashi Love Jihad Row

देवभूमी रक्षा अभियान संघटनेने लावलेल्या पोस्टरमध्ये 15 जून रोजी होणाऱ्या महापंचायतीपूर्वी दुकाने रिकामी करण्याचा इशारा दिला आहे. 15 जून रोजी पुरोला येथे मोठ्या प्रमाणावर उत्तरकाशी महापंचायत बोलावण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने परवानगी देण्यास साफ नकार दिला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांचं म्हणणं आहे की, अशा प्रकरणांमध्ये कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही कायदा हातात घेऊ दिला जाणार नाही.

Uttarkashi Love Jihad Row
Cyclone Biparjoy Alert : कोकण किनारपट्टीवर 'या' कारणामुळं मोठ्या लाटा; तज्ज्ञांकडून महत्वाची अपडेट समोर

स्थानिक लोकांच्या धमक्या आणि संताप पाहून मुस्लिम दुकानदार आपली दुकाने रिकामे करत आहेत. ते ठिकाण सोडून जात आहेत. दशकांचा जुना व्यवसाय संपत आहे. काही दुकानदार म्हणतात, आम्हाला आता इथे राहायचं नाही, इथे आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिली नाही. वातावरण बदलत आहे. त्यांना असुरक्षित वाटत आहे. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने पोस्ट केले जात आहेत. ज्यामध्ये अनेक लोक दुकानांची तोडफोड करत आहेत. हल्ला करत आहेत. दरम्यान, पोलीस त्यांना हटवत आहेत.

Uttarkashi Love Jihad Row
Belgaum : पती आईपासून विभक्त होत नव्हता म्हणून सुनेनं सासूचा केला खून; डोक्यात रॉडने हल्ला

असद मदनी यांनी अमित शहांना लिहिलं पत्र

उत्तराखंडमधील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना महमूद असद मदनी यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे. असद यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून उत्तरकाशी येथे 15 जून रोजी होणारी हिंदू महापंचायत थांबवण्याची विनंती केली आहे.

Uttarkashi Love Jihad Row
धक्कादायक! 'या' नामांकित हॉस्पिटलमध्ये महिलेचा अर्धवट गर्भपात? आरोग्याधिकाऱ्यांचा छापा

मौलाना महमूद असद मदनी यांनी आवाहन केलं आहे की, समाज तोडणाऱ्या शक्तींवर कारवाई करून लोकांच्या जीवित व मालमत्तेचं रक्षण करावं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उत्तराखंड वक्फ बोर्ड आणि हज समितीचे सदस्य मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. मुस्लिमांना त्रास देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com