Marathi Schools : मराठी शाळांमध्ये परप्रांतीय विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश; सरकारी शाळांत पटसंख्या वाढणार!

गेल्या काही वर्षापासून मराठी, कन्नड व उर्दू माध्यमांच्या सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे.
Belgaum Marathi Medium
Belgaum Marathi Mediumesakal
Summary

मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या भागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.

बेळगाव : एकीकडे पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या (English Medium) शाळांकडे वाढत असताना विविध व्यवसायाच्या निमित्ताने बेळगाव शहर (Belgaum) आणि परिसरात वास्तव्य करून असलेले परप्रांतीय मराठी माध्यमाच्या (Marathi Medium) शाळांना प्राध्यान्य देऊ लागले आहेत.

त्यामुळे सरकारी मराठी शाळांमध्ये (Marathi Schools) विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी परप्रांतीयांचा मोठा आधार मिळत असून, यावर्षी शहरातील निम्म्याहून अधिक मराठी शाळांमध्ये परप्रांतीय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतला आहे. शहर आणि परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या वाढली आहे.

Belgaum Marathi Medium
Ratnagiri : तब्बल 700 शिक्षकांच्या बदल्या, दोन हजार पदं रिक्त; विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा होणार बट्ट्याबोळ

तसेच पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून मराठी, कन्नड व उर्दू माध्यमांच्या सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. तरीही इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा कल वाढल्याने सरकारी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी, यासाठी शिक्षकांना विशेष मोहीम हाती घ्यावी लागत आहे.

कोरोनानंतर पालकांनी पाल्यांना पुन्हा मराठी शाळांमध्ये दाखल केले होते. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले, मात्र परिस्थिती पूर्वपदावर येताच पुन्हा एकदा पालकांनी खासगी शाळेत प्रवेश घेण्याकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. पुन्हा एकदा सरकारी शाळांमध्ये पटसंख्या वाढावी, यासाठी सरकारी शाळांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

उत्तर भारतातील अनेक नागरिक विविध कामधंद्याच्या निमित्ताने शहर आणि उपनगरात मोठ्या संख्येने स्थायिक झाले आहेत. हिंदी भाषिक पट्ट्यातील नागरिकांनी पाल्यांना इंग्रजी किंवा इतर माध्यमाऐवजी मराठी शाळांना प्राधान्य दिले आहे. ३१ मे पासून सुरू झालेल्या नव्या शैक्षणिक वर्षात आतापर्यंत मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थ्यामध्ये परप्रांतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे.

Belgaum Marathi Medium
Uttarkashi Love Jihad Row : लव्ह जिहाद प्रकरण पेटलं; 3 वर्षात 1035 हिंदू मुली बेपत्ता, महापंचायत भरणार

त्यामुळे मराठी शाळांना दिलासा मिळाला आहे. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या भागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मातृभाषेतून शिक्षण घ्यावे, यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात असताना पालक इंग्रजीकडे वळत आहेत. अशा परिस्थितीत परप्रांतीय मराठी शाळांसाठी आधार ठरू लागले आहेत.

Belgaum Marathi Medium
Ulhasnagar : भाजपनं लावलेला 'तो' बॅनर मध्यरात्री गेला चोरीला; शिवसेनेवर चोरीचा आळ

मराठी भाषिकांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व समजून घेत पाल्यांना मराठी शाळेत पाठवून दिले पाहिजे. शहरात हिंदी भाषिक पट्ट्यातील पालक सुरुवातीपासूनच आपल्या पाल्यांना मराठी शाळेत पाठवून देतात. येणाऱ्या काळात मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी उपक्रम हाती घेतला जाणार आहे. विद्यार्थ्यांना लवकरच शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे.

-अंकुश केसरकर, अध्यक्ष, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com