

KSA League Rangala Talim
sakal
कोल्हापूर : शाहू छत्रपती के.एस.ए. फुटबॉल लीग वरिष्ठ ‘ए’ डिव्हिजनमध्ये इतिफाक आझादने फ्री किकवर मारलेला चेंडू थेट गोल जाळ्यात विसावला. त्यामुळे रंकाळा तालीम मंडळाने तुल्यबळ फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळचा चुरशीच्या साखळी सामन्यात दोन विरुद्ध एक अशा गोल फरकाने पराभव केला.