

Police Issue Strict Warning
sakal
कोल्हापूर : ‘फुटबॉल मैदानावरील ईर्ष्या मैदानावरच संपवा. त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल. कोणाचीही गय केली जाणार नाही. सोशल मीडियावर प्रक्षोभक मेसेज करणारे तसेच मैदानावर अश्लील हावभाव करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल’, असा सज्जड दम पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी आज येथे दिला.