Fox Attack in Kolhapur : भरवस्तीत कोल्ह्याचा धुमाकूळ; नागरिकांवर हल्ला, थरारनाट्यानंतर पकडलेल्या कोल्ह्याचा मृत्यू
Fox Enters Residential Area in Kolhapur : कोल्हापूरमधील कदमवाडी परिसरात कोल्हा शिरल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालं. नागरिकांवर हल्ला केल्यानंतर अग्निशमन व वन विभागाने पाऊणतासात कोल्ह्याला जेरबंद केलं.
कोल्हापूर : कदमवाडी येथील विठ्ठल मंदिर चौकातील भरवस्तीत शुक्रवारी रात्री आलेल्या कोल्ह्यामुळे (Fox Attack in Kolhapur) धावपळ उडाली. एका घरात लपलेल्या कोल्ह्याने बाहेर जमलेल्या जमावातील व्यक्तीवर हल्ला केला.