

Road Safety Impact Story
esakal
Youth Killed In Road Accident Kolhapur : (कुंडलिक पाटील) : कोल्हापूर गगनबावडा मुख्य मार्गावर खुपिरे हद्दीत दुचाकीची मालवाहतूक टेम्पोला जोरात धडक झाली. यामध्ये तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला. सौरभ संजय सुतार वय २४ रा.खुपिरे असे त्याचे नाव आहे. तर त्याचा मित्र आकाश सर्जेराव सुतार वय २४ हा गंभीर जखमी झाला आहे.रात्री साडेअकरा वाजता हा अपघात झाला , वर्दी पोलीस पाटील सविता शिवाजी गुरव यांनी दिल्यानंतर घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.