Jat Water Shortage : ५३ गावांत पाणीटंचाई; २० गावांना १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू जत तालुक्यात विहिरी आणि तलाव कोरडे

19 Tankers Supply Water to 20 Villages : जत तालुक्यात पावसाने दडी मारल्याने ५३ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. २० गावांना १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून १६ गावांचे टँकर प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहेत.
Jat Water Shortage

Jat Water Shortage

esakal

Updated on: 

संख : जत तालुक्यात मॉन्सूनच्या पावसाने दडी मारल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. विहिरी आणि तलाव कोरडे पडल्याने यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसमोर गणेशमूर्तींचे विसर्जन कुठे करायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. जत तालुक्यात सध्या ५३ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, त्यांपैकी २० गावांना १९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

आणखी १६ गावांचे टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. पाण्याचे स्रोत आटत चालल्याने विहिरी, तलाव आणि प्रकल्पांतील पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे. तालुक्यातील २७ प्रकल्पांमध्ये केवळ ७ टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.

Jat Water Shortage
Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

त्यांपैकी १७ प्रकल्पांमध्ये मृत साठा असून, सहा तलाव कोरडे पडले आहेत. गतवर्षी याच कालावधीत तालुक्यातील प्रकल्पांमध्ये ४९ टक्के पाणी साठा होता. त्यामुळे यंदा परिस्थितीत मोठी घट झाली आहे. वळसंग, शेड्याळ, सिंदूर, पांढरेवाडी, काराजनगी, सोन्याळ, कोळगिरी, सुसलाद, दरीकोणूर, लमाणतांडा (दबा), तिल्याळ, एकुंडी, माडग्याळ, व्हसपेठ, मुचंडी, खंडनाळ, कागनरी, कुलाळवाडी आणि सोरडी या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

\यंदा पाऊस कमी जत तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ४५७.७ मिलिमीटर असून, आजअखेर केवळ १८२ मिलिमीटर नोंद झाली आहे. ऐन पावसाळ्यातही भूजल पातळी ५०० ते ६०० फुटांपर्यंत खाली गेली आहे.

जालिहाळ (बुद्रुक), भिवर्गी, पांडोझरी, तिकोंडी क्र. १, सोरडी, दरीबडची, उमराणी, सिद्धनाथ, कोळगिरी आणि तिकोंडी क्र. २ हे तलाव कोरडे पडले आहेत. जिरग्याळ, गुगवाड, बेळुंखी, मिरवाड, उमराणी, अंकलगी, दोड्डीनाला मध्यम प्रकल्प, कंठी, रेवनाळ, डफळापूर, सनमडी, बिळूर (आरक्की) आणि खोजनवाडी आदी तलावांतील पाणी साठा मृत संचयाखाली गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com