Kolhapur Ganeshotsav
sakal
कोल्हापूर: गणेशोत्सवाच्या उत्साहात आज शहरातील प्रमुख मंडळांच्या गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आकर्षक विद्युत रोषणाई, देखण्या गणेशमूर्ती आणि विविध विषयांवरील सजीव देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. देशभक्ती, सामाजिक प्रबोधन, ऐतिहासिक प्रसंग, क्रांतिकारी महापुरुषांचे जीवनकार्य, तसेच ‘भुतांची गुहा’ यासारखे विविध विषयांवरील देखावे पाहण्यासाठी राजारामपुरी, शाहूपुरी, मंगळवार पेठ, शिवाजी पेठ आणि सायबर परिसरात भाविकांची अक्षरशः झुंबड उडाली.