

Ganja and Mava Sale Exposed
sakal
कोल्हापूर : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात चक्क पोत्याने गांजा आला आहे. गांजा व मिक्स माव्याची विक्री करण्यासाठी झोपडपट्टी परिसरात त्याचे मुख्य केंद्र केल्याचा एक व्हिडिओ समोर आला. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून हे अवैध धंदे सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधितांवर कारवाई होईल, अशी अपेक्षा स्थानिक महिलांसह नागरिकांनी केली आहे.