Kolhapur Gas Explosion : कोल्हापूर गॅस स्फोट प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या ५ वर्षीय प्रज्वलची झुंज व्यर्थ, आतापर्यंत तिघांचा मृत्यू

Kolhapur News Today : या प्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. त्यामुळे कंपनी ठेकेदार व अभियंत्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
Kolhapur Gas Explosion

Kolhapur Gas Explosion

esakal

Updated on

Tragic Gas Blast Kolhapur : कळंबा कारागृहाच्या पिछाडीस असलेल्या मनोरमा कॉलनीत २५ ऑगस्टच्या रात्री गॅसचा स्फोट होऊन घरातील चौघे गंभीर जखमी झाले होते. या स्फोटात शीतल अमर भोजणे (वय २९) यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे सासरे अनंत भोजणे (६०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या प्रज्वल अमर भोजणे (वय ५) याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर थांबल्याने या दुर्घटनेत तिसरा बळी गेला. या प्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. त्यामुळे कंपनी ठेकेदार व अभियंत्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com