Kolhapur flower exhibition at Police Garden
esakal
कोल्हापूर : रोजच्या पाहण्यातील फुलं माहिती आहेतच; पण त्यातही कैक प्रकारची विविधता असते. त्यांच्याच कुळातली विविधरंगी फुलं, त्यांचा सुगंधही मनाला टवटवीत करतो. बोन्साय ऐकण्यात (Kolhapur Flower Festival Latest News) आहे; पण ते प्रत्यक्ष कसे असतात आणि त्यातील विविध रचना, अशा विविध अंगांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळ प्रस्तुत ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हल एक अनोखी कार्यशाळाच ठरते आहे. कसबा बावडा रोडवरील पोलिस उद्यानात हा महोत्सव सजला असून, शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींनी आता महोत्सव ‘ओव्हरपॅक’ होऊ लागला आहे.