Global Flower Festival Kolhapur 2026 : कॅक्टस, बोन्सायपासून ते थेट औषधी वनस्पतींपर्यंत..; कोल्हापुरातील 'सकाळ ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हल'ला निसर्गप्रेमींची तुडुंब गर्दी

Global Flower Festival in Kolhapur Attracts Nature Lovers : कोल्हापुरातील पोलिस उद्यानात सकाळ प्रस्तुत ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हल रंगला आहे. फुलांच्या विविध जाती, हजारो रंगछटा, बोन्साय, कॅक्टस, दुर्मिळ वनस्पती आणि बागकाम मार्गदर्शनाने निसर्गप्रेमींचे लक्ष वेधले आहे.
Global Flower Festival Kolhapur 2026

Global Flower Festival Kolhapur 2026

esakal

Updated on: 

कोल्हापूर : तब्बल तीनशे ते चारशे प्रकारच्या फुलांच्या जाती, चाळीसहून अधिक फुलांचे क्रॉप्स, हजारांहून अधिक रंगछटा, फुलांत सजलेल्या विविध कलाकृती, हा सारा निसर्गसोहळा अनुभवण्यासाठी निसर्गप्रेमींची गर्दी अक्षरशः ओसंडून वाहू लागली (Sakal Global Flower Festival Kolhapur) आहे. निमित्त आहे, ‘सकाळ’ प्रस्तुत ‘ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हल’चे. कसबा बावडा रोडवरील पोलिस उद्यानात हा महोत्सव सजला असून, शाळकरी मुलांपासून ज्येष्ठापर्यंतच्या तीन पिढ्यांचा आनंदोत्सव यानिमित्ताने अनुभवायला मिळतो आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com