Global Flower Festival Kolhapur 2026
esakal
कोल्हापूर : नजर जाईल तिथंपर्यंत फुलेच फुले...पण, ती ओळखायची कशी? अगदी सोपं आहे. जिथे जिथे फुलांच्या विविधांगी रचना केल्या आहेत, तिथे त्यांची थोडक्यात माहिती आहेच. पण, त्याशिवाय तिथे असलेला क्यूआर कोड स्कॅन केला की मराठी, हिंदी आणि इंग्रजीत त्याची इत्यंभुत माहिती मिळते (Sakal Global Flower Festival Kolhapur timings) आहे. निमित्त आहे... ‘सकाळ’ प्रस्तुत ‘ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हल’चे.