Kolhapur Global Flower Festival world record
esakal
कोल्हापूर : निसर्गाच्या नावीन्यपूर्ण सौंदर्याचे दर्शन घडविणाऱ्या ‘सकाळ’ प्रस्तुत ‘ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हल’मध्ये आज रंगबिरंगी फूलझाडांतून साकारलेल्या ‘श्रीयंत्र’, ‘कुस्तीचा आखाडा’ आणि ‘कोल्हापुरी चप्पल’ या तीन भव्य कलाकृतींच्या जागतिक नोंदीचा विक्रम (Kolhapur flower festival Golden Book of World Records) झाला. या अनोख्या कलाकृतींची दखल घेत ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ने प्रमाणपत्र देऊन गौरविले.