Kolhapur Gokul Election : 'गोकुळचे खाजगीकरण करण्यासाठी 200 कोटींची ऑफर आली होती'; सतेज पाटलांच्या वक्तव्याने खळबळ, कोणावर केला गंभीर आरोप?

Gokul Dairy privatization 200 crore offer Satej Patil Mahadev Jankar : गोकुळ दूध संघाच्या खासगीकरण आणि मल्टिस्टेट करण्याच्या कथित प्रयत्नांवरून सतेज पाटील यांनी महादेव जानकरांवर गंभीर आरोप केले. २०० कोटींच्या कथित ऑफरमुळे राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे.
Satej Patil allegations against Mahadev Jankar Gokul Dairy

Satej Patil allegations against Mahadev Jankar Gokul Dairy

esakal

Updated on: 

कोल्हापूर : गोकुळ दूध संघ जिल्ह्याची अस्मिता आहे. तो कोल्हापूरचाच राहिला पाहिजे, दूध उत्पादक तुम्हाला खूप-खूप आशीर्वाद देतील अशी विनंती माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना केली होती. त्यानुसार त्यांनी गोकुळचे खासगीकरण होऊ दिले नाही. मात्र, जानकर यांनी गोकुळचे खासगीकरण आणि मल्टिस्टेट करण्यासाठी २०० कोटींची ऑफर दिल्याचे सांगितलेली बाब खूपच गंभीर असल्याची टीका आमदार सतेज पाटील यांनी आज केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com