Satej Patil vs Mahayuti in Kolhapur politics
esakal
कोल्हापूर : राज्यात महायुतीची सत्ता, या सत्तेत असलेल्या जिल्ह्यातील तीन दिग्गज मंत्र्यांचा दबदबा, त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप अशी एका बाजूला शक्तिशाली ताकद असताना सोबत कार्यकर्त्यांची प्रामाणिक आणि निष्ठावंत फळी घेऊन एकट्याच्या जीवावर काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी (Satej Patil strategy in Gokul election) ‘गोकुळ’च्या राजकारणात वादळात दिवा लावला. त्यांच्या ‘परफेक्ट’ नियोजनामुळे महायुतीचाच आणि त्यात महाडिक-मुश्रीफ या जोडीचा ‘करेक्ट’ कार्यक्रम झाला. या विजयाने आमदार सतेज पाटील यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतले.