Gokul election 2026 Arun Dongale
esakal
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत राधानगरी तालुक्यातून महायुतीत आमच्याशिवाय अन्य पर्यायांचा विचार झाल्यास आम्हाला गृहीत धरू नका, असा सज्जड इशारा ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी (Kolhapur Gokul Election) दिला. यातून त्यांनी महायुतीत जिल्हा बँकेचे संचालक ए. वाय. पाटील यांचे नाव न घेता त्यांना थेट विरोध दर्शविला. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे या मेळाव्याचाही नूर बदलला.