

Shoumika Mahadik Gokul Election
esakal
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने १४ जागांवर आघाडी घेत महायुतीला जोरदार आव्हान दिले आहे. या निवडणुकीत महायुतीच्या प्रमुख उमेदवार शौमिका महाडिक यांच्यासह माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, विश्वास पाटील आणि नाविद मुश्रीफ यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.