Vishwas Patil and Arun Dongale political setback
esakal
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या राजकारणात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दबदबा निर्माण करताना सत्तेच्या चाव्या स्वतःजवळ ठेवलेले माजी अध्यक्ष विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांच्यावर या निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जाण्याची वेळ (Vishwas Patil Gokul election defeat) आली. आपण म्हणजे ‘गोकुळ’ आणि आम्ही जिकडे तिकडेच विजय या भ्रमात असलेल्या या दोघांना ठरावदारांनी जागा दाखवली.